Price: ₹ 189.00
(as of Feb 08,2023 10:05:52 UTC – Details)
From the Publisher
Warren Buffett by Sudhir Rashingkar
वॉरन बफे यांचा सर्वांगीण परिचय करून देणं हे खरंतर एक मोठं आव्हानच! गुंतवणूक क्षेत्रात लक्ष घालून अवघ्या तेहतिसाव्या वर्षी दशलक्षाधीश झालेल्या वॉरन बफे यांनी गुंतवणुकीत यश मिळावं यासाठी स्वत:चे काही नियम तयार केले आहेत आणि त्यामुळं आजपर्यंत त्यांना गुंतवणुकीमध्ये कधीही विशेष धोका पत्करावा लागला नाही. वॉरन बफे यांचा व्यावसायिक क्षेत्रातील पराक्रम कसा वाढत गेला याची या पुस्तकात डॉ. राशिंगकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. एवढं प्रचंड यश मिळूनही वॉरनला अहंकाराचा स्पर्शही झालेला नाही. स्वत:च्या उत्पन्नातील 90 टक्के पैसा उदारहस्ते त्यांनी सामाजिक कार्याकरिता दिला आहे. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील महामेरू असलेल्या व्यावसायिकाकडून भारतातील सर्व व्यावसायिकांनी बोध घ्यायलाच हवा. या आगळ्यावेगळ्या गुंतवणूकसम्राटाच्या योगदानाचा यथोचित परामर्श घेणारं हे पुस्तक संग्राह्य असंच आहे.
डॉ. प्र. चिं. शेजवलकर
माजी अध्यक्ष
महाराष्ट्र साहित्य परिषद
खेळण्याच्या वयात कोकच्या 6 बाटल्यांचा संच विकून 5 सेंटस्चा स्वकष्टार्जित नफा मिळवणार्या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात अत्यंत दुर्मिळ असणार्या संपूर्ण नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणार्या बोटांवर मोजता येण्याइतक्याच व्यक्ती जगात असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी 90 टक्के संपत्ती कुठलाही गाजावाजा न करता समाजाला परत देणं हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचार्यांनाही यशाचं क्षितीज दाखवणार्या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.
त्या सार्या तुम्हा वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!
विशेष म्हणजे वॉरनने स्वत: सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या 10 मार्गांसह!खेळण्याच्या वयात कोकच्या 6 बाटल्यांचा संच विकून 5 सेंटस्चा स्वकष्टार्जित नफा मिळवणार्या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात अत्यंत दुर्मिळ असणार्या संपूर्ण नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणार्या बोटांवर मोजता येण्याइतक्याच व्यक्ती जगात असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी 90 टक्के संपत्ती कुठलाही गाजावाजा न करता समाजाला परत देणं हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचार्यांनाही यशाचं क्षितीज दाखवणार्या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.
त्या सार्या तुम्हा वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!
विशेष म्हणजे वॉरनने स्वत: सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या 10 मार्गांसह!
डॉ. सुधीर राशिंगकर
· ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयात पुणे विद्यापीठातून ‘‘विद्या-वाचस्पती’’ (पीएच.डी.)
· व्यवस्थापन क्षेत्रात संशोधकांचे मार्गदर्शक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात काम.
· गेली चाळीसहून अधिक वर्षं अनेक वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकांतून सातत्याने विविध विषयांवर स्तंभलेखन.
· 30 हून अधिक पुस्तके प्रकाशित.
· काही वर्षं तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कूपर इंजिनिअरिंग व टेल्को (आता टाटा मोटर्स) मध्ये काम केल्यावर 1975 पासून स्वतंत्र व्यवसायात कार्यरत.
· उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षण व संशोधनासाठी लागणार्या यंत्रसामग्री व उपकरणांच्या विपणनाचे भारतभर व शेजारील देशांत काम.
· ‘प्रकल्प व्यवस्थापनाच्या’ क्षेत्रात काही परदेशी कंपन्यांबरोबर काम. गेली चाळीसहून अधिक वर्षं संपूर्ण भारतभर व अन्य पस्तीसहून अधिक देशांत विस्तृत भ्रमण. रोटरी इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व अन्य अनेक पदांवर काम.
· उत्कृष्ट कामाबद्दल रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त. इतर अनेक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था-संघटनांत विविध पदांवर कार्यरत.