UPSC Marathi Literarture Main Exam (Optional) Sandarbh Margarshak Pustika


Price: ₹ 725.00
(as of Sep 23,2021 06:49:22 UTC – Details)


UPSC Marathi Literature, Main Exam. (Optional) केंद्रीय लोकसेवा आयोग, मराठी वाङ्मय, मुख्य परीक्षा पेपर क्रमांक १ संदर्भ मार्गदर्शक पुस्तिका (प्रश्नोत्तरी स्वरूपात) केंद्रिय लोकसेवा आयोग, मुख्य परीक्षा करिता आपण मराठी वाङ्मय हा विषय घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन! आपल्या या प्रवासाला सर्वार्थाने सहाय्यभूत होण्यासाठी प्रस्तुतची संदर्भ मार्गदर्शक पुस्तिका मी मोठ्या कष्टाने व प्रेमाने तयार केली आहे. खरे तर, साहित्य, जीवन, समाज वा संस्कृती हे प्रांत मुळातच मूलगामी व सर्वव्यापी असल्याने, त्यांना एका ग्रंथात बंदिस्त करणे, हे खरोखरीच अवघड आहे. पण तरीदेखील महद् प्रयासाने मी संपूर्ण अभ्यासक्रम वा प्रश्न जास्तीत जास्त सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विभागाला व प्रश्नाला न्याय देण्याचा माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न केला आहे. नानाविध संदर्भ पुस्तकांचा काळजीपूर्वक अभ्यास करुन तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा, दृष्टी व चौकट मिळावी, म्हणून प्रस्तुत पुस्तिकेचे लेखन-संपादन-संकलन आणि नेमके आकलन करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आपण त्यावर पूर्ण विश्वास ठेवून मोठ्या उमेदीने, प्रेमाने व पूर्ण क्षमतेने-चैतन्याने वाटचाल करावी, असे मला मनापासून वाटते. यातून तुम्हाला एक नवी दिशा, दृष्टी आणि चौकट मिळाली, तर मला विलक्षण आनंद वाटेल. धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *