The Greatest Salesman In the World : The Greatest Salesman in the World in Marathi


Price: ₹ 100.00
(as of Sep 27,2021 01:25:22 UTC – Details)


द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ हे पुस्तक मी वाचलेल्या प्रेरणादायी, प्रवृत्त करणाऱ्या, उन्नत करणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे. – नॉर्मन विन्सेंट पील प्रत्येक पिढी, तिचे स्वतःचे असे ‘शक्तीचे साहित्य’ निर्माण करीत असते. अंश साहित्यातून वाचणाऱ्याचे जीवन शब्दशः बदलण्याची ताकद अशा प्रकारच्या असते. याच परंपरेतील, ‘द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ या पुस्तकाच्या वाट्याला अगणित व्यक्तींचे जीवन प्रभावित करण्याचे श्रेय जाणार आहे. दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हफीद नावाच्या एका उंट राखणाऱ्या मुलाविषयी आणि जीवनातील त्याचे कनिष्ठ दर्जाचे स्थान सुधारण्यासाठीच्या त्याच्या मनातील ज्वलंत इच्छेविषयीची ही एक आख्यायिका आहे. त्याच्यातील सुप्त क्षमता सिद्ध करण्यासाठी, त्याला मोठ्या काफिल्याच्या व्यापाऱ्याद्वारे- पाथ्रोसद्वारे बेथलहेमला पाठविले जाते, केवळ एक झगा विकण्यासाठी. ते विकण्यात तो अपयशी ठरतो आणि दयेच्या एका क्षणात वाहवून ते अमूल्य वस्त्र, त्याच्या खाणावळीजवळील एका गुंफेत, एका नवजात बालकाला ऊब मिळावी म्हणून देऊन मोकळा होतो.. हफीद काफिल्यात ओशाळवाणा होऊन परत येतो; पण तो येत असताना एक तेजाने झळाळणारा तारा त्याच्या डोक्यावर प्रकाशत असतो. पाथ्रोस या घटनेचा अर्थ एक दैवी संकेत असा करतो आणि हफीदला दहा प्राचीन चर्मपत्रे देतो, ज्यांच्यात या मुलाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे ज्ञान सामावलेले असते. या कालाबाधित कहाणीत मूळ चर्मपत्रांतील संपूर्ण लिखाण सामावलेले आहे. हफीद जगातील सर्वांत महान सेल्समन बनण्यासाठी या लिखाणातील रहस्यांचा व्यवहारात वापर, करतो. … आणि त्यांनी त्याच्यासाठी जी सिद्धी खेचून आणली, तशीच ते तुमच्याहीबाबत करू शकतात… कारण आपण सगळेच ‘सेल्समन’ असतो… आणि आपण आपल्या स्वतःला इतरांना कसे ‘विकतो’ यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते.From the Publisher

The Greatest Salesman In The World by Og Mandino

The Greatest Salesman In the WorldThe Greatest Salesman In the World

लेखक म्हणतो की, कोणी बुद्धी विकतो तर कोणी श्रम, कोणी ज्ञान तर कोणी कौशल्य. म्हणजेच तुम्ही कोणतेही काम किंवा व्यवसाय करीत असलात तरी मुळात तुम्ही एक सेल्समन असता. मग ही सेल्समनशिप चांगली करण्यासाठी पुस्तकातील यश प्राप्तीची दहा सुत्रे वापरून तुम्हाला तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात तर प्रगती करता येईलच; पण त्याचबरोबर एक परिपूर्ण, समाजोपयोगी व मनाने समृद्ध जीवन कसे जगता येईल हे देखील या पुस्तकात स्पष्ट केले आहे. अनाथ असूनही उंट राखणाऱ्या एका सतरा अठरा वर्षांचा किशोर या दहा सूत्रांच्या मदतीने त्याच्या मालकापेक्षा अपार धनदौलत कमावतो आणि त्याचा वसा त्याच्या योग्य उत्तराधिकाऱ्याला देऊन कृतार्थ होतो. अशी ही कथा आहे. अफाट संपत्ती मिळवण्याबरोबरच नातेसंबंधांची जपवणूक, समाजहिताची जाणीव आणि तलम वाळूप्रमाणे हातातून बेमालुमपणे सरणाऱ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग कसा करावा हे या पुस्तकातून कळते.

या पुस्तकात प्रभावी विक्रीसंबंधीचे दहा मूलभूत नियम सांगितले आहेत आणि खूप चांगल्या रीतीने सांगितले आहेत. स्वत: सेल्समन असलेला लेखक – आणि आपण प्रत्येकजण एक सेल्समन असतोच- अनुभवातून बोलतो. त्याचा सुज्ञपणाचा सल्ला प्रत्येक व्यक्तीला महान यश मिळवायला उपयोगी पडेल. मी सगळ्यांना त्याची शिफारस करतो.’

– रेव. जॉन ओ’ब्रिअन

‘‘द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ हे पुस्तक मी वाचलेल्या प्रेरणादायी, प्रवृत्त करणाऱ्या, उन्नत करणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे.’

– नॉर्मन विन्सेंट पि पील

‘‘विक्री आणि विक्रीचे कसब शिकविणारे असे पुस्तक जे जुन्या आणि जाणत्यांनी तसेच नवनियुक्तांनी वाचून आनंद घ्यावा. मी प्रामाणिकपणे सांगतो की, विक्रीचा व्यवसाय कसा करावा, हे शिकविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे, अत्यंत रचनात्मक आणि अत्यंत उपयोगी साधन आहे.’’

– एफ. डब्ल्यू, एरिगो

मॅनेजर, यू.एस. सेल्स

ट्रेनिंग पार्क. डेविस अ‍ॅण्ड कंपनी

प्रत्येक पिढी, तिचे स्वत:चे असे ‘शक्तीचे साहित्य’ निर्माण करीत असते. असे साहित्य वाचणाऱ्याचे जीवन शब्दश: बदलण्याची ताकद, अशा प्रकारच्या साहित्यात असते. याच परंपरेतील, ‘जगातील सर्वांत महान सेल्समन’ या पुस्तकाच्या वाट्याला अगणित व्यक्तींचे जीवन प्रभावित करण्याचे श्रेय जाणार आहे.

दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हफीद नावाच्या एका उंट राखणाऱ्या मुलाविषयी आणि जीवनातील त्याचे कनिष्ठ दर्जाचे स्थान सुधारण्यासाठीच्या त्याच्या मनातील ज्वलंत इच्छेविषयीची ही एक आख्यायिका आहे. त्याच्यातील सुप्त क्षमता सिद्ध करण्यासाठी, त्याला मोठ्या काफिल्याच्या व्यापाऱ्याद्वारे- पाथ्रोसद्वारे बेथलहेमला पाठविले जाते, केवळ एक झगा विकण्यासाठी. ते विकण्यात तो अपयशी ठरतो आणि दयेच्या एका क्षणात वाहवून ते अमूल्य वस्त्र, त्याच्या खाणावळीजवळील एका गुंफेत, एका नवजात बालकाला ऊब मिळावी म्हणून देऊन, मोकळा होतो..

हफीद काफिल्यात ओशाळवाणा होऊन परत येतो; पण तो येत असताना एक तेजाने झळाळणारा तारा त्याच्या डोक्यावर प्रकाशत असतो. पाथ्रोस या घटनेचा अर्थ एक दैवी संकेत असा करतो आणि हफीदला दहा प्राचीन चर्मपत्रे देतो, ज्यांच्यात या मुलाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे ज्ञान सामावलेले असते.

या कालाबाधित कहाणीत मूळ चर्मपत्रांतील संपूर्ण लिखाण सामावलेले आहे. हफीद जगातील सर्वांत महान सेल्समन बनण्यासाठी या लिखाणातील रहस्यांचा व्यवहारात वापर करतो. … आणि त्यांनी त्याच्यासाठी जी सिद्धी खेचून आणली, तशीच ते तुमच्याहीबाबत करू शकतात… कारण आपण सगळेच ‘सेल्समन’ असतो… आणि आपण आपल्या स्वत:ला इतरांना कसे ‘विकतो’ यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते.

ऑग मॅन्डिनो ऑग मॅन्डिनो

ऑग मॅन्डिनो

ऑग मॅन्डिनो हे सक्सेस अनलिमिटेड या मासिकाचे माजी अध्यक्ष होते. तसेच त्यांनी अमेरिकन नॅशनल स्पीकर्स असोसिएशन, हॉल ऑफ फेममध्येही स्थान भुषविले आहे. त्यांच्या पुस्तकांच्या 50 लाख प्रती विकल्या गेल्या आहेत; तसेच त्यांचे लिखाण 25 विविध भाषांमधून अनुवादितही केले गेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *