द पॉवर ऑफ हॅबिट ( मराठी )


Price:
(as of Jun 22,2021 07:02:29 UTC – Details)


द पॉवर ऑफ हॅबिट आपण जे करतो ते का करतो? ते कसे बदलायचे न्युयॉर्क टाईम्सचे अर्थविषयक पारितोषिकप्राप्त पत्रकार चार्ल्स डुहीग, हे त्यांच्या द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकातून आपल्याला सवयींसंबधीच्या आश्चर्यकारक आणि चित्तथरारक वैज्ञानिक जगताची सफर घडवून आणतात. काही व्यक्तींना आणि कंपन्यांना स्वतःला बदलण्यासाठी अनेक वर्षे का प्रयत्न करावे लागतात, का झगडावे लागते, तर त्याच वेळी काही मात्र, स्वतःमध्ये एका रात्रीत बदल घडवून आणतात हे कसे याचा ते शोध या पुस्तकामध्ये घेतात. आपल्या सवयी कसे कार्य करतात आणि त्यांचा आपल्या मेंदूमध्ये नेमका कोठे उगम होतो याचा शोध घेण्यासाठी, मेंदू वैज्ञनिकांचे चाललेले प्रयत्न जाणून घेण्यासाठी ते विविध प्रयोगशाळांना भेटी देतात आणि ऑलिंम्पिक जलतरणपटू मायकेल फेल्फ, स्टार बक्सचे मुख्याधिकारी हॉवर्ड शुल्झ आणि नागरी हक्क चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या यशामध्ये सवयीचा वाटा किती महत्त्वाचा होता याचा ते रहस्यभेद करतात. त्या सर्वांचा परिपाक म्हणजे हे लक्षवेधी कथन आणि सशक्त शोध ः व्यायामामध्ये नियमित पण आणण्यासाठी, वजन घटवण्यासाठी हुशार मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी, कार्यक्षमतेमध्ये वृद्धी करण्यासाठी, अद्वितीय आस्थापनांची उभारणी इत्यादी करण्यासाठी, सवयी काय व कशा उपयोगी पडू शकतात. याचे मर्म जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या नव्याने विकसित झालेल्या शास्त्राचा उपयोग करून आपण आपल्या व्यवसायात, आपल्या समाजात आणि आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून आणू शकतो. लालित्यपूर्ण सुबोधता असलेले, प्रभावी विचार प्रवर्तक, चौकस आणि उपयुक्त. – जिम कॉलिन्स बौद्धिक गांभिर्य आणि आपल्या वाईट सवयी सोडण्याचे मार्ग, याबद्दलचा व्यवहार्य सल्ला याचा संतुलित मेळ राखणारे, पहिल्या दर्जाचे पुस्तक. – द इकॉनॉमिस्ट अक्षरशः संमोहित करणारे. – द इकॉनॉमिस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *