Leadershipche Rahasya: Becoming A Person Of Influence – Marathi


Price: ₹ 182.00
(as of Sep 19,2021 00:23:59 UTC – Details)


जॉन सी. मॅक्सवेल हे अमेरिकेच्या नेतृत्व या विषयातील तज्ज्ञ आहेत, ते व्यक्तिगतरीत्या हजारो आणि लाखो व्यक्तींना प्रत्येक वर्षी मार्गदर्शन करतात. त्यांनी त्यांचे नेतृत्वाचे तत्त्व फॉर्च्युन ५०० कंपनी, द युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकॅडमी, वेस्ट पॉइंट आणि एन.सी.ए.ए., एन.बी.ए. आणि एन.एफ.एल. येथील सहकाऱ्यांसमोर मांडले आहे. मॅक्सवेल हे काही संस्थांचे संस्थापक आहेत, ज्यामध्ये मॅक्झिमम इम्पॅक्ट याचा समावेश आहे, जे लोकांना त्यांच्या नेतृत्व सामर्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्यास समर्पित आहे. ते चाळीसपेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये डेव्हलपिंग द लीडर विदिन यू, युवर रोड मॅप फॉर सक्सेस, विनिंग विथ पीपल आणि द २१ इर्रिफ्युटेबल लॉज ऑफ लीडरशिप यांचा समावेश आहे, ज्यांच्या एक दशलक्षापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. जॉन सी. मॅक्सवेल यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या. www.maximumimpact.com नेतृत्वाची योग्य व्याख्या “नेतृत्व ही एक प्रभावी बाब आहे. बस इतकेच, यापेक्षा जास्त काहीही नाही आणि कमीही नाही… जो कोणी असा विचार करतो की तो नेतृत्व करू शकतो; पण त्याचे अनुसरण कोणी करत नाही, तो केवळ (फिरण्यासाठी) चालत असतो.” नेतृत्वाचा विशेष गुण “जे ‘जन्मतःच’ नेतृत्व गुण घेऊन आले आहेत, त्या विशिष्ट समूहासाठीच नेतृत्व मर्यादित नाही. नेतृत्वाचा विशेष गुण म्हणजे नेतृत्वाची मूळ स्थिती होय, जी प्राप्त केली जाऊ शकते. तुमच्या इच्छा आणि गुणांना एकत्रित करा आणि मग उत्कृष्ट नेता बनण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही. कार्य व्यवस्थापन आणि नेतृत्वामधील फरक “इतरांनी काम पूर्ण केले की नाही याची खात्री करून घेणे हे व्यवस्थापकाचे कार्य असते आणि इतरांना उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरित करणे, हे नेत्याचे कार्य असते.”From the Publisher

Leadershipche Rahasya: Becoming A Person Of Influence by John C. Maxwell

Leadershipche Rahasya: Becoming A Person Of Influence by John C. MaxwellLeadershipche Rahasya: Becoming A Person Of Influence by John C. Maxwell

Book review

‘‘समाजात विविध क्षेत्रात नेतृत्वाची नेहमीच गरज असते. समाज स्थितिशील असतो. मात्र नेते समाजाला जागृत करून गतिमान बनवू शकतात. अशा प्रकारचा गतिमान समाज स्वावलंबी बनून आपल्या समस्यांची उकल करण्याच्या दिशेने कार्यान्वित होऊ शकतो याचं आकलन सदर पुस्तक करून देईल.

नेतृत्व हा गुण जन्मजातच असतो असे नाही तर त्याचे प्रशिक्षण देऊनही नेतृत्व विकसित करता येते असा मॅक्सवेल यांचा अनुभव आहे.

तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्तीत नेतृत्वाचे सुप्त गुण असतातच. त्यांचा साक्षात्कार आणि ते गुण प्रत्यक्षात आत्मसात करण्याची पात्रता विकसित करण्याची प्रेरणा हे पुस्तक देईल, असा विश्वास वाटतो.’’

-प्रा. दिनकर बोरीकर

तुम्ही नेत्याचं कामं करण्याची पात्रता कमवावी, अशी माझी इच्छा आहे. हे पुस्तक केवळ याच उद्देशानं लिहिलं आहे. तुम्ही हे पुस्तक वाचाल आणि त्यातील सिद्धांत अमलात आणण्यास सुरुवात कराल, तेव्हा ब्रूस लार्सनचं स्मरण अवश्य करा. त्यांनी ‘विंड अ‍ॅण्ड फायर’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी सँडहिल क्रेन्स म्हणजे सारस या पक्षाच्या बाबतीत मोठी मजेशीर माहिती दिली आहे. “महाद्विपांच्या पलीकडे दूर अंतरावर उडत जाणार्‍या या मोठ्या पक्ष्यात तीन उल्लेखनीय गुण असतात. एक म्हणजे, थव्यातील प्रत्येक पक्षी आळीपाळीनं नेतृत्व करतो, म्हणजे नेता बनतो. एकच पक्षी नेहमी थव्याच्या पुढे नसतो. त्यामुळं नेतृत्वाची संधी प्रत्येकाला मिळते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते असा पक्षी नेता म्हणून निवडतात जो विरोध-प्रतिकूल परिस्थितीला हाताळू शकतो. आणि तिसरं म्हणजे, जेव्हा एक जण नेतृत्व करतो तेव्हा बाकीचे पक्षी त्याचा उत्साह वाढवतात, त्याला पाठबळ देतात. त्याच्या पाठीशी उभे राहतात.”

मला आशा आहे की, तुम्ही नेतृत्वाविषयी पुरेसे शिकाल आणि तुमच्या समुदायामध्ये आघाडीचं स्थान घ्याल. जेव्हा तुम्ही असा प्रयत्न कराल तेव्हा मला आंतरिक समाधान मिळेल आणि मी अतिशय आत्मसंतुष्टीने तुमच्या पाठीशी राहील.

प्रत्येक युगात असा एखादा प्रसंग येत असतो की, त्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी नेता हवा असतो, नेता म्हणून त्याला पुढं व्हावं लागत असतं. त्यामुळे त्याच्यात क्षमता आहे असा एकही नेता सापडणार नाही की, ज्याला नेतृत्वाची संधी मिळाली नाही. संधी असतेच, फक्त पुढं होऊन नेतृत्व करणारा हवा असतो. तुम्ही हे पुस्तक वाचा आणि संधीचा लाभ घेण्यासाठी तयार व्हा.’’ – जॉन सी. मॅक्सवेल

या पुस्तकात तुम्ही वाचणार आहात ‘नेतृत्त्वाची सर्वोच्च कौशल्य.’

नेतृत्वाची योग्य व्याख्या

“नेतृत्व ही एक प्रभावी बाब आहे. बस इतकेच, यापेक्षा जास्त काहीही नाही आणि कमीही नाही… जो कोणी असा विचार करतो की तो नेतृत्व करू शकतो; पण त्याचे अनुसरण कोणी करत नाही, तो केवळ (फिरण्यासाठी) चालत असतो.”

नेतृत्वाचा विशेष गुण

“जे ‘जन्मतःच’ नेतृत्व गुण घेऊन आले आहेत, त्या विशिष्ट समूहासाठीच नेतृत्व मर्यादित नाही. नेतृत्वाचा विशेष गुण म्हणजे नेतृत्वाची मूळ स्थिती होय, जी प्राप्त केली जाऊ शकते. तुमच्या इच्छा आणि गुणांना एकत्रित करा आणि मग उत्कृष्ट नेता बनण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही.

कार्य व्यवस्थापन आणि नेतृत्वामधील फरक

“इतरांनी काम पूर्ण केले की नाही याची खात्री करून घेणे हे व्यवस्थापकाचे कार्य असते आणि इतरांना उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरित करणे, हे नेत्याचे कार्य असते.”

John C. Maxwell John C. Maxwell

जॉन सी. मॅक्सवेल

जॉन सी. मॅक्सवेल हे अमेरिकेच्या नेतृत्व या विषयातील तज्ज्ञ आहेत, ते व्यक्तिगतरीत्या हजारो आणि लाखो व्यक्तींना प्रत्येक वर्षी मार्गदर्शन करतात. त्यांनी त्यांचे नेतृत्वाचे तत्त्व फॉर्च्युन ५०० कंपनी, द युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकॅडमी, वेस्ट पॉइंट आणि एन.सी.ए.ए., एन.बी.ए. आणि एन.एफ.एल. येथील हकाऱ्यांसमोर मांडले आहे.

मॅक्सवेल हे काही संस्थांचे संस्थापक आहेत, ज्यामध्ये मॅक्झिमम इम्पॅक्ट याचा समावेश आहे, जे लोकांना त्यांच्या नेतृत्व सामर्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्यास समर्पित आहे. ते चाळीसपेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये डेव्हलपिंग द लीडर विदिन यू, युवर रोड मॅप फॉर सक्सेस, विनिंग विथ पीपल आणि द २१ इररिफ्युटेबल लॉज ऑफ लीडरशिप यांचा समावेश आहे, ज्यांच्या एक दशलक्षापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. जॉन सी. मॅक्सवेल यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या. www.maximumimpact.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *